सावंतवाडी / प्रतिनिधी
सर्वोदय नगर मधील नगरपालिकेच्या जमिनीत एका बिल्डर कडून विनापरवाना गटाराचे बांधकाम केले जात आहे.त्यात सांडपाणी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी तेथील रहिवासी गणेश ऊर्फ बाळ बोर्डेकर यांनी सावंतवाडी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबत प्रसिद्ध दिले आहे त्यात असे म्हटले आहे की त्या ठिकाणी काम करत असलेल्या एका खाजगी बिल्डरकडून नगरपालिकेच्या जमिनीत गटार खोदण्याचे काम सुरू आहे. भविष्यात त्या ठिकाणी गटाराचे पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालावा अशी मागणी त्यांनी केलीय.