Tarun Bharat

President Election: राष्ट्रपती पदासाठी UPA कडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राष्ट्रपती निवडणुकीच्या रणनीतीबाबत राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी १७ पक्षांच्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार (President Candidate) बनवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

यशवंत सिन्हा २७ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील असे मानले जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या मागील बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही मांडला होता. मात्र पवारांनी नकार दिला होता. याशिवाय गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव पुढे आले होते. त्यांनी देखील यासाठी नकार दिला होता. त्यानंतर आता सिन्हा यांचे नाव पुढे आले आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री कोणाला करायचं हे सेना ठरवेल

यशवंत सिन्हा यांचं ट्विट
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या ट्विटने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, राज्यसभा आणि त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत टीएमसीला मिळालेल्या सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल मी ममता बॅनर्जींचा आभारी आहे. आता वेळ आली आहे की, पक्षापासून दूर राहून, एका मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी मी मोठ्या विरोधी एकजुटीसाठी काम केले पाहिजे. यशवंत सिन्हा यांनी भाजपमधून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या ट्विटनंतर ते विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे.

Related Stories

”देशासमोर असणारे असंख्य प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा हवा”

Sumit Tambekar

चर्चेदरम्यान चीनने वाढविले सैनिक

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून अंधेरीत 4 ठिकाणी छापे

Rohan_P

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी गाठला 55 लाखाचा टप्पा

datta jadhav

मुंबई : सीबीआय कार्यालयात 68 पॉझिटिव्ह

datta jadhav

ब्रिटनची रॅडुकानू बनली नवी टेनिस युवराज्ञी

Patil_p
error: Content is protected !!