Tarun Bharat

‘भाजपला आव्हान देण्यासाठी’ आयएनएलडीच्या रॅलीत विरोधी नेते एकत्र

Advertisements

नवी दिल्ली : हरियाणाच्या फतेहाबादमध्ये आयोजित आयएनएलडीच्या भव्य रॅलीसाठी भाजप विरोधात आघाडीसाठी प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. केंद्रातील भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या रॅलीला संबोधित करताना जेडीयू नेते के.सी. त्यागी म्हणाले की “काँग्रेसचे आठ माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये सामील झाले असतानाही बिहारचे मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्यासाठी पाटण्याहून आले आहेत. नितीश कुमार यांना ईडी, आयकर आणि इतर एजन्सीची कोणतीही भीती नाही.

माजी उपपंतप्रधान आणि INLD संस्थापक देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि शिवसेनेचे अरविंद सावंत हे देखील विरोधी एकजुटीसाठीच्या आयोजित रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

अनेक प्रादेशिक पक्षांचे एकत्र येणे हे विरोधी ऐक्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले जाते. नितीश कुमार आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद या रॅलीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्येष्ठ समाजवादी नेते त्यागी केसी यांनी ही एक ऐतिहासिक बैठक असल्याचे म्हटले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात समविचारी शक्तींचे एकत्रीकरण लक्षवेधक ठरेल.

Related Stories

दर आठवडय़ाला दौरा करणार ४ मंत्री

Patil_p

पंतप्रधान मोदींकडून अनेक शैक्षणिक योजना घोषित

Amit Kulkarni

रालोआत जागावाटप जवळपास निश्चित

Patil_p

जपानने काढून घेतला विशेष दर्जा

Patil_p

Kanataka : महिलेला थप्पड मारणाऱ्या मंत्र्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मागितले स्पष्टीकरण

Kalyani Amanagi

साखर निर्यातीवर बंदी कायम

Patil_p
error: Content is protected !!