Tarun Bharat

५० खोके, एकदम ओके; मुख्यमंत्री शिंदेंसमोर विरोधकांची घोषणाबाजी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिलेच अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला विधानभवनात दाखल झाले तेव्हा विरोधकांनी ५० खोके आले अशा शब्दांत घोषणा देत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. (Opposition party leader slams cm eknath shinde group)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधानभवनात मुख्यमंत्री शिंदे आणि आमदारांचे आगमन होताच ‘आले, आले ५० खोके आले, ५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Monsoon Assembly Session Live: विधानसभेत नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना म्हटले. तसेच, धनंजय मुंडे यांनी राज्यातील सत्ताधरी शिंदे गटाला गद्दार असे म्हटले. याशिवाय घोषणा देत ५० खोके आले असल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्यासोबत सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकाराचा निषेध केला.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर यावेळी झळकावण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.

Related Stories

खमींगर ग्लेशियरमध्ये 12 ट्रेकर्स अडकले; दोघांचा थंडीने मृत्यू

datta jadhav

कोरोनाची धास्ती : पंजाबमध्ये 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू

Rohan_P

कोल्हापूर : कोगेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

शिरवळमध्ये मांडुळाची तस्करी रोखली

Patil_p

अभिमानास्पद…कृष्णा रुग्णालयाचा कोरोना लस संशोधनात सहभाग

Patil_p

दारू पिऊन घर पेटवणाऱयाला 3 वर्ष सक्तमजुरी

Patil_p
error: Content is protected !!