Tarun Bharat

दूधसागर ऑनलाईन बुकिंगसाठी जीईएलच्या वेबसाईटला विरोध

दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनची खास सभा

प्रतिनिधी /धारबांदोडा

कुळे येथील दूधसागर धबधबा पर्यटन व्यवसाय सरकारने जीईएल मार्फत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनने जोरदार विरोध केला आहे. असोसिएशनची वेबसाईट आहे व त्यामाध्यमातून ऑनलाईन जीप गाडय़ांचे बुकींग सुरु आहे. त्यात बदल न करता पूर्वी प्रमाणेच ते सुरु ठेवावे असा ठराव नुकत्याच झालेल्या असोसिएशनच्या विशेष सभेत घेण्यात आला.

गेल्या तीन वर्षांपासून दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनची पर्यटकांना बुकिंग करण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यात काही तांत्रिक चुका असल्यास सुधारणा करण्यात यावी. मात्र ती जीईएलकडे देऊ नये, अशी जीप मालकांची मागणी आहे. या विषयी बोलताना जीप मालक निलेश वेळीप म्हणाले, गेल्या महिन्याच्या 24 तारखेला असोसिएशनची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत व त्यापूर्वी झालेल्या सर्व सभांमध्ये जुन्याच वेबसाईटवर जीपगाडय़ांचे ऑनलाईन बुकींग घेण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला होता. तोच कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता, असे असतानाही पुन्हा त्यात बदल का केला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असोसिएशनचे माजी सचिव नरेश शिगांवकर म्हणाले, आमदार निलेश काब्राल हे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी जीईएल व वनखाते यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर चर्चा केली होती.

टूर ऑपरेटर्स आपल्या वेबसाईटवर बुकिंग करीत असल्यास योग्य ती खबरदारी घेऊन बुकिंग करण्यात यावी, अशी सूचना त्यावेळी त्यांनी केली होती. त्यानंतर माजी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत असोसिएशनच्या समितीची बैठक झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सौम्य भुमिका घेत दूधसागर ऑपरेटर्सच्या वेबसाईटवर बुकिंग करताना पर्यटकांची कुठलीच तक्रार येता काम नये अशी समज देऊन हा विषय संपवला होता. त्यावेळी समितीने ऑनलाईन सेवा देण्यासाठी 15 दिवसांची मुदत मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती. व त्या मुदतीत असोसिएशनने स्वतंत्र वेबसाईट तयार करून घेतली होती. मागील तीन वर्षे ही बुकिंग सेवा स्वतंत्रपणे सुरु आहे. मग आत्ताच त्यात बदल करण्याचे कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असोसिएशनच्या वेबसाईटमध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करून ही सेवा कायम सुरु ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली. असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी त्याला मान्यता दिली. याशिवाय वनखात्याने जीप मालकांकडून जे प्रतिज्ञापत्र मागितले आहे त्यातील जीईएल हा शब्द वगळला तर हे प्रतिज्ञापत्र सही करून वनखात्याला देण्यात कोणतीच हरकत नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. दरम्यान मंगळवारी दूधसागर टूर ऑपरेटर्सच्या समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. त्यात जीईएल मार्फत दूधसागर पर्यटन व्यवसाय ऑनलाईन सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला होता, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर यांनी या विशेष सभेत दिली. सभेला उपाध्यक्ष अशोक गावकर, सचिव सत्यवान नाईक, खजिनदार मंगलदास च्यारी, कार्यकारिणी सदस्य सतीश सातपालकर, बॅनी आझावेदे, नंदीश देसाई व दिलीप मायरेकर हे उपस्थित होते.

Related Stories

‘जीसीए’च्या कारभारात कोटय़वधींचा घोटाळा

Patil_p

पेडणे मतदारसंघातूनच लढणार : बाबू आजगावकर

Amit Kulkarni

भाजपतर्फे राजमाता विजयाराचे सिंधीया यांची जयंती साजरी

Omkar B

मुरगावच्या क्रूझ टर्मिनलवरील टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीचे पडसाद मुक्तीदिन समारंभात उमटले

Amit Kulkarni

पालिका निवडणुकीची आज घोषणा

Amit Kulkarni

कुंकळळी युनायटेड हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघ बैठक संपन्न

Amit Kulkarni