Tarun Bharat

शिंजो आबे यांच्या ‘स्टेट फ्यूनरल’ला विरोध

Advertisements

वृद्धाने स्वतःला पेटवून घेतले ः प्रतिकात्मक अंत्यसंस्कारासाठी 910 कोटीचा खर्च

वृत्तसंस्था/ टोकियो

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर राजकीय इतमामात 27 सप्टेंबर रोजी टोकियो येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. परंतु जनतेने राजकीय शोक पाळण्यास नकार दिला आहे. ‘स्टेट फ्यूनरल’च्या विरोधात एका वृद्ध व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयानजीक स्वतःला पेटवून घेतले आहे.

या व्यक्तीचे वय सुमारे 70 वर्षे असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या व्यक्तीकडे एक पत्र मिळाले असून त्यात त्याने स्टेट फ्यूनरलला विरोध असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱयाने दिली आहे.

राजकीय इतमामातील अंत्यसंस्काराच्या मुद्दय़ावरून सप्टेंबरमध्ये योमीउरी शिंबून सर्वेक्षण पार पडले आहे. या सर्वेक्षणात 56 टक्के लोकांनी शासकीय खर्चात अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत असे म्हटले आहे. आबे यांच्या स्टेट फ्यूनरलकरता सुमारे 910 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. टोकियो येथील न्यायालयात राजकीय इतमामातील अंत्यसंस्कारावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे.

जपानमध्ये सर्व अंत्यसंस्कार वैयक्तिक स्वरुपात पार पाडले जातात. याचमुळे आबे यांच्या स्टेट फ्यूनरलला विरोध होत आहे. यापूर्वी 1967 मध्ये माजी पंतप्रधान शिगेरू योशिदा यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते. तर पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी एका संसदीय चर्चेदरम्यान आबे यांच्या स्टेट फ्युनरलकरता 910 कोटी रुपये सरकार खर्च करणार असल्याचे सांगितले आहे.  जपानमध्ये सर्वसाधारणपणे राजघराण्यातील सदस्य किंवा पंतप्रधानांवरील अंत्यसंस्कार राजकीय इतमामात किंवा शासकीय खर्चावर न करण्याची परंपरा आहे.

आबे यांच्या स्टेट फ्यूनरलसाठी येणारा खर्च पूर्वी सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टी उचलणार होती. 2011 मध्ये जपानला धडकलेल्या त्सुनामीच्या संकटातून आबे यांनी देशाला प्रभावीपणे बाहेर काढले होते. त्यांच्या प्रभावी शासनामुळे आणि लोकप्रियतेमुळे वर्तमान सरकार आबे यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करू इच्छित आहे.

6,400 अतिथी उपस्थित राहणार

आबे यांची 8 जुलै रोजी हत्या झाली होती. आबे यांच्यावर त्यांचे कुटुंब पूर्वी 15 जुलै रोजी अंत्यसंस्कार करणार होते. परंतु आता होणाऱया आबे यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह 190 देशांमधील 6,400 महनीय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Related Stories

ब्रिटन पंतप्रधानपद शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर

Amit Kulkarni

इंडोनेशियातील प्रवाशी विमान रडारवरून गायब

datta jadhav

इजिप्तमध्ये रोबोटिक टेस्टिंगची तयारी

Patil_p

जगभरात 4 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

कोरोना संसर्गावर नव्या उपचारपद्धतीची तयारी

Patil_p

पाकिस्तानात सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!