Tarun Bharat

तोंडवळी प्राथमिक शाळा झाली विद्यार्थ्यांना विना सुनी

Advertisements

ज्यादिवशी शिक्षक मिळेल तेव्हा मुले पाठवू ग्रामस्थांचा निर्णय 

आचरा/ प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी खालची या शाळेला आवश्यक  शिक्षक तातडीने  न मिळाल्यास  मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय तोंडवळी तळाशिल ग्रामस्थांनी घेतला होता याबाबत शिक्षण विभागाने कळवूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी शाळेत मुले पाठवण्याचे बंद केले आहे जोपर्यंत मागणी केलेले शिक्षक  शाळेत  हजर होत नाहीत तोपर्यंत शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत मुले पाठवण्याची विनंती करण्यास दाखल झालेल्या केंद्रप्रमुखांना आपली भूमिका सांगत ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले असून होण्याऱ्या मुलांच्या शैक्षणिक नुकसाना शिक्षण विभाग जबाबदार असल्याचे उपस्थित ग्रामस्थ, पालकांनी सांगितले शैक्षणिक वर्ष सर्व शाळांमध्ये सुरू झाले असताना तोंडवळी शाळा मात्र मुले नसल्याने सुनी सुनी झाली होती. 


तोंडवळी खालची या इयत्ता सातवी पर्यंत असलेल्या आणि पटसंख्या पंचवीस असलेल्या प्राथमिक शाळेत सध्या दोनच शिक्षक कार्यरत आहेत.  या साठी शाळा व्यवस्थापन समित अध्यक्ष चोडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन एप्रिल मध्ये गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. गटशिक्षणाधिकारी यांचे  लेखी अर्जाद्वारे लक्ष वेधूनही संबंधितांकडून अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Related Stories

पावणेतीन कोटी बोनस प्राप्त

NIKHIL_N

पालकमंत्री उदय सामंत आज जिल्हा दौऱयावर

NIKHIL_N

दाणोली येथील पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Ganeshprasad Gogate

नागरिक स्वतःहून समोर येत नसल्याने कारोना चाचण्यांचे प्रमाण घटले

Patil_p

रत्नागिरीत आणखी 13 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

चिपळूणात कोरोना रूग्णसंख्या 500च्या पार

Patil_p
error: Content is protected !!