रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात 09 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 या काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे व Orange Alert घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी मार्फत करण्यात येत आहे.
सततच्या पडणा-या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी
1) मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
2) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
3) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.
4) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
5) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील प्रमाणे जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षास संपर्क साधावा.
१. जिल्हा नियंत्रण कक्ष – ०२३५२- २२६२४८/२२२२३३
२. पोलीस नियंत्रण कक्ष- ०२३५२-२२२२२२
३. राजापूर तहसील कार्यालय – ०२३५३-२२२०२७
४. लांजा तहसील कार्यालय – ०२३५१- २९५०२४
५. रत्नागिरी तहसील कार्यालय – ०२३५२-२२३१२७
६. संगमेश्वर तहसील कार्यालय – ०२३५२-२६००२४
७. चिपळूण तहसील कार्यालय – ०२३५५ – २९५००४
८. गुहागर तहसील कार्यालय – ०२३५९ – २४०२३७
९. खेड तहसील कार्यालय – ०२३५६ – २६३०३१
१०. दापोली तहसील कार्यालय – ०२३५८- २८२०३६
११. मंडणगड तहसील कार्यालय ०२३५०-२२५२३६
6) हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdimumbai.gov.in
या संकेतस्थळावरून घ्यावी.
7) कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी. किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352)226248 /222233 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.
8) अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे.
9) आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र या ठिकाणी आपण राहत
असल्यास प्रशासनाकडून मिळणा-या सूचनांचे पालन करावे.
10) पुरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
(11) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.
12) अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये.
(13) अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन
चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.
14) पुराच्या पाण्यात समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी केले आहे.

