Tarun Bharat

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा आदेश

मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी घेतली अधिकाऱयांची बैठक : आजपासूनच अतिक्रमणे हटविण्याची शक्यता

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी मनपाकडून मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता विविध विभागातील कर्मचाऱयांची पथके नियुक्ती करून अनधिकृत बांधकामांची माहिती घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी बजावला आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बुधवारपासून रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम मनपाकडून राबविण्याची शक्मयता आहे.

महापालिका व्याप्तीमध्ये अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने तक्रारी करूनही महापालिका अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी मंगळवारी सायंकाळी नगरयोजना विभागाचे अभियंते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांसह महसूल उपायुक्त व विविध अधिकाऱयांची बैठक घेतली.

अनधिकृत बांधकामांबाबत नगर योजना विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी नोटीस का बजावली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी ठोस कारवाई करण्याची सूचना आयुक्त रुद्रेश घाळी यांनी केली.

  जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱयाची

ही जबाबदारी केवळ नगर योजना विभागाच्या अधिकाऱयांची नसून महापालिकेत काम करणाऱया प्रत्येक कर्मचाऱयाची आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनीही अनधिकृत बांधकामांची माहिती घेऊन वरि÷ांकडे कळविणे बंधनकारक आहे. पण ही जबाबदारी आपली नसल्याचे सांगून दुर्लक्ष केले जाते. मात्र, यापुढे असा बेजबाबदारपणा चालणार नाही, अशी सूचना आयुक्तांनी केली.

पथके नियुक्तीचा आदेश…

शहरातील रस्त्यांशेजारी फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रस्त्याशेजारी अतिक्रमण होत असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्याचा आदेश बजावला. स्वच्छता निरीक्षक, महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क, सेक्शन ऑफिसर, साहाय्यक अभियंते, साहाय्यक कार्यकारी अभियंते अशा विविध अधिकाऱयांच्या पथकांची नियुक्ती करून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे हटविण्याचा आदेश आयुक्तांनी बैठकीवेळी दिला. रस्त्याशेजारील अतिक्रमणे हटविण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची सूचना बजावली. त्यामुळे बुधवारपासून रस्त्याशेजारील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई मनपाकडून राबविण्याची शक्मयता आहे.

Related Stories

शेतात गांजा पिकविणाऱयाला दहा वर्षे कारावास

Amit Kulkarni

नादुरुस्त बसगाड्यांनी प्रवासी हैराण

Amit Kulkarni

युनियन जिमखाना, सीसीआय, नीना विजयी

Amit Kulkarni

मंगळवारी तब्बल 4,270 रुग्ण कोरोनामुक्त

Omkar B

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे गैरप्रकार टाळा

Omkar B

रेबीजबाबत शहर-ग्रामीण भागात जागृती

Patil_p