बेळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ बेळगाव च्या वतीने गेल्या 6 जानेवारीपासून अंगडी कॉलेज मैदानावर सुरू करण्यात आलेल्या अन्नोत्सव या उपक्रमास चोखंदळ बेळगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी सुमारे 15000 हून अधिक नागरिकांनी भेट देऊन विविध स्टॉलवर जाऊन मनपसंद खाद्यावर ताव मारला.सर्वच स्टॉल फुल झाल्याचे चित्र दिसत होते .रविवारी वाढलेली ट्रॅफिक जाम लक्षात घेऊन सोमवारपासून पार्किंगची जागा वाढवण्यात आली आहे. तसेच सेक्युरिटी ची व्यवस्था वाढविण्यात आली आहे असे रोटरी कडून कळविण्यात आले आहे. आज शरीर सौष्टव स्पर्धा श्री नितीन शिरगुरकर यांनी निर्माण केलेल्या “गदायुद्ध’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येणार असून त्यांनी पुरस्कृत केलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा आज सोमवार दि.९ जानेवारी सायंकाळी ६ नंतर संपन्न होणार आहेत .जिल्हा व कॉलेज पातळीवर होणाऱ्या ‘मि रोटरी’ या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर वर्ल्ड असलेले अनुजकुमार हे उपस्थित राहणार असून ते प्रात्यक्षिके करून दाखवणार आहेत. गदायुद्ध या चित्रपटाचा मुख्य कलाकार सुमित याप्रसंगी उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहन करण्यात आले आहे
Trending
- सदनिकधारक आजपासून घरपट्टी भरू शकतात
- बांधकाम कामगारांच्या समस्या 15 दिवसांत सोडवू
- जांबोटी परिसरात पाणीटंचाईचे सावट गडद
- राज्यात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ
- बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेची सांगता
- कापोली परिसरात काँग्रेसचा प्रचार
- बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर रहदारीची कोंडी
- मार्कंडेय नदी पुलाच्या दुतर्फा स्वच्छतेची मागणी