Tarun Bharat

‘ऊर्जिता’तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

प्रतिनिधी /बेळगाव

तरुण भारतच्या ‘मी ऊर्जिता’तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन डिसेंबर 2022 पासून करण्यात आले आहे. या स्पर्धा ऊर्जिता सदस्यांसाठीच मर्यादित आहेत. सदर स्पर्धेअंतर्गत ‘पुष्परचना’ ( फ्लॉवर डेकोरेशन), ‘मेहंदी काढणे’, ‘गिफ्ट हॅम्पर’ तयार करणे, ‘वेशभूषा’ (फॅन्सी ड्रेस) व ‘पाककला’ स्पर्धेअंतर्गत एक ‘सूप आणि ग्रेव्ही बेस डिश’ तयार करणे अशा स्पर्धा होणार आहेत.

यातील पहिल्या तीन स्पर्धा स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन करावयाच्या आहेत. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी स्पर्धकांनी वेशभूषेसह तयार होऊन सादरीकरण करावयाचे आहे. पाककला स्पर्धेअंतर्गत व्हेज, नॉनव्हेज कोणतीही डिश चालेल, परंतु त्या दोन्ही एकाच कॅटेगरीतील असाव्यात. स्पर्धेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ऊर्जिताच्या व्यासपीठावरून संपूर्ण वर्षभर अशा विविध स्पर्धा होणार आहेत.

ऊर्जिता सदस्यत्वाची सशुल्क नावनोंदणी तरुण भारत कार्यालयात सुरू आहे. महिलांनी या व्यासपीठाचा लवकरात लवकर येऊन लाभ घ्यावा व ऊर्जिताचे सदस्य व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8095497664 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.  

Related Stories

सोमवारी रुग्ण संख्येत किंचित वाढ

Patil_p

महिला आघाडीतर्फे आयोजित महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sandeep Gawade

दक्षता हॉस्पिटलमध्ये हृदय दिनाचे आचरण

Patil_p

राष्ट्रीय युवजन सप्ताहाची सांगता

Patil_p

केएलई आयुर्वेद महाविद्यालयाचे यश

Amit Kulkarni

उचगाव येथे होणार अठरावे साहित्य संमेलन

Patil_p