विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
आचरा प्रतिनिधी
आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे रामेश्वर मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना दिमाखात झाली यावर्षी 39 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कीर्तन, आमने सामने डबलबारी भजन, फुगडी स्पर्धा, जोडी नृत्य स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, विविध दर्जेदार ऑर्केस्ट्रा, विविध मंडळाचे दशवतार, भजने असे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदिप परबमिराशी व सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.