मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार : अमृतमहोत्सवी सोहळ्यात अभिष्टचिंतन
फोंडा : कुठलीही समाजोपयोगी संस्था सरकारपेक्षा सेवाभावी कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रकारे चालवू शकतात. कारण समाजातील दुर्बल घटकांप्रती आत्मियता व तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांचे बळ त्यामागे असते. नागेश फडते हे त्यापैकी एक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व मागृछायेला सुऊवातीच्या काळात नागेश सरांसारखे कुटुंबापलिकडे विचार करणारे निस्वार्थी कार्यकर्ते लाभले म्हणून या संस्था मोठ्या झाल्या असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. दुर्भाट येथील शारदा इंग्लीश हायस्कूलचे निवृत्त शिक्षक, संघाचे स्वयंसेवक व समाजकार्यकर्ते नागेश फडते यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. फर्मागुडी येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांनी नागेश फडते यांचे अभिष्टचिंतन कऊन त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव केला. नागेश सरांनी आपल्या कार्यातून मोठा परिवार जोडलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषीमंत्री रवी नाईक, जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर, माजी खासदार अॅङ नरेंद्र सावईकर, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. मनोहर आडपईकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, डॉ. गोविंद काळे, सत्कारमूर्ती नागेश फडते, सौ. निलीमा नागेश फडते आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक यांनी नागेश फडते यांच्यासोबत सुऊवातीच्या काळात संघ व भाजपाच्या उमेदवारीच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. राष्टीय विचारांच्या मुशीत वाढलेले फडते हे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्यातून इतरांनी उर्जा घ्यावी असे हे सदाबहार व्यक्तीमत्त्व आहे. मंत्री रवी नाईक म्हणाले, नागेश फडते यांच्यासारख्या निस्वार्थी कार्यकर्त्यांमुळेच भाजपा आज सार्वेच्च स्थानी पोचू शकला. त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक संदेश दिला आहे. नागेश फडते हे संघ परिवारातील विश्वासू रत्न आहे, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले. अॅङ नरेंद्र सावईकर, रितेश नाईक, अॅङ मनोहर आडपईकर यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव कऊन शुभेच्छा दिल्या. डॉ. गोविंद काळे यांनी ‘आई’ या कवितासंग्रहावर भाष्य केले. माजी विद्यार्थी प्रा. अनंत नाईक, नागेश फडते यांचे विद्यार्थी दशेतील मित्र प्रा. मिलिंद म्हाडगूत आदींनी नागेश सरांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी आपले अनुभव सांगितले. नागेश फडते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, विधात्यानेच आपल्या हातून हे कार्य करवून घेतले आहे, आपण निमित्तमात्र असल्याचे सांगितले. सुऊवातीला सेवा दल व त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्या जीवनावर प्रभाव टाकणारे काही प्रसंग त्यांनी सांगितले. शारदा हायस्कूलमधील माजी विद्यार्थी तसेच अन्य हितचितंकातर्फे नागेश फडते यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. फडते यांनी तीन भाषांमध्ये लिहिलेल्या ‘आई’ या कवितासंग्रहाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. यावेळी फडते यांचे कुटुंब सदस्य व असंख्य हितचितंकांनी शुभेच्छा दिल्या.