Organized free workshops and awareness campaign for disabled people in Sawantwadi
सावंतवाडी येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक बांधिलकी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी सावंतवाडी एस टी स्टँड समोर, काझी शाहबुद्दीन हॉल, येथे जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधवांसाठी मोफत कार्यशाळा व जनजागृती मोहीम आयोजित केली आहे.
ही कार्यशाळा सकाळी 10:30 तें दुपारी 3:30 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमात अध्यक्ष श्री.अनिल परुळेकर, उपाध्यक्ष श्रीम.कमलताई परुळेकर, प्रमुख पाहुणे श्री.बबन साळगावकर, जिल्हा विधी व न्याय समिती चे न्यायाधीश श्री म्हालटकर साहेब,श्री.जयवंत जावडेकर मुख्याधिकारी, सावंतवाडी उवस्थित राहणार आहेत. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व बांधवांसाठी वय वर्ष (6 तें 60 ) खुल्या चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अधिक माहितीसाठी 9405264027 या नंबरवर संपर्क साधा.
सावंतवाडी / प्रतिनिधी