Tarun Bharat

तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

Organized health camp on behalf of Taluka Journalist Association

मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.


यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष गजानन नाईक,उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक ज्ञानेश्वर दुर्भाटकर, पत्रकार संघाचेजिल्हा सचिव संतोष सावंत, प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर,विजय देसाई, अभिमन्यू लोंढे, राजेश मुंडकर, सचिन रेडकर,उमेश सावंत मोहन जाधव, कोकणसादचे पाटील, विनायक गावस, आनंद धोंड,अनिल भिसे, आधी पत्रकार उपस्थित होते.


दरम्यान या शिबिरात सावंतवाडीतील ५० ते ६० पत्रकारांनी लाभ घेतला असल्याचे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी सांगितले यावेळी बोलताना डॉक्टर डॉ दुर्भातटकर म्हणाले की सावंतवाडीतील पत्रकारांनी नेहमीच मला साथ दिली आहे. त्यानी मला प्रत्येक कामात प्रोत्साहन दिले.तसेच यापुढे मिळावे असे पत्रकारां विषयी गौरोदगार काढले.तसेच मी चांगले काम करतो त्यात माझ्या सर्व सहकारी डॉक्टरांचा व सर्व स्टाफचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय मी कोणतेही काम करू शकत नाही असेही ते म्हणाले.

या शिबिरासाठी बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत, डॉ. वजारटकर, डॉ. सागर जाधव, डॉ चौगुले, डॉ निखिल अवधूत, डॉ. मनाली पतवारी, उबाळे मॅडम, पी.पी. राणे, विद्या येळेकर,कुशे, लॅब टेक्निशियन नितीन सौदागर, अमित लिंगवत, लॅब असिस्टंट वैभवी बांदेकर, शलाका देसाई, अंकिता गवस, परिचर छाया राऊत, अनिता अहिरे आदींचे सहकार्य लाभले.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

पोसरे ग्रामस्थांची पावसाच्या लहरीपणावर मात!

Patil_p

महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत- ललित गांधी

Anuja Kudatarkar

गावठी दारू विकणाऱया दोघांना अटक

Patil_p

नखे-पंजा काढून बिबटय़ाला पुरले

Patil_p

कोनाळकट्टा हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना करण्यात आले सायकल वाटप

NIKHIL_N

खारफुटीच्या न्यायवैद्यिक माहिती संकलनात महाराष्ट्र नंबर वन..!

Omkar B