Tarun Bharat

‘लोकमान्य’तर्फे 16 रोजीपासून देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी/ पणजी

लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडतर्फे 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन दि. 16 रोजी ते 22 रोजीपर्यंत राज्यभरात विविध ठिकाणी करण्यात आले. राष्ट्र उभारणीत नवीन पिढीला सहभागी करून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून देशभक्ती आणि भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत 66 पेक्षा जास्त शाळांचा सहभाग असून 8 ते 12 जणांचा गट असेल. सकाळी 10 वा. ते दुपारी 1 वाजेपर्यंत सदर स्पर्धा सुरू राहणार असून यात मराठी, हिंदी भाषेत देशभक्तीपर गीते सादर करण्यात येणार आहेत. दि. 16 रोजी श्री बोडगेश्वर मंदिर सभागृह म्हापसा, दि. 17 रोजी किर्ती विद्यालय स्कूल हरमल, दि. 18 रोजी रोझरी हायस्कूल कुजिरा, दि. 19 रोजी झांटय़े कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंट स्टडीज सर्वण सांखळी, दि. 22 रोजी लोकविश्वास प्रतिष्ठान ढवळी फोंडा येथे सदर स्पर्धा होणार आहे.

Related Stories

भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे

datta jadhav

विजय सरदेसाईंकडून ऑक्सिजन पेढीची घोषणा

Amit Kulkarni

दक्षिण गोव्यात 1006 ज्येष्ठ नागरिक एकाकी जीवन जगतात

Amit Kulkarni

बोगमाळोत गोळय़ा झाडून युवकाचा खून

Omkar B

आगोंद – काणकोण येथील पॉली हाऊसला आग

Amit Kulkarni

अवकाळी पावसाचा दोन दिवस प्रभाव

Amit Kulkarni