Organized various programs on the occasion of Datta Jayanti at Surangpani
खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी श्री दत्त जयंती उत्सव आयोजित केला आहे. ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रोज सकाळी श्रींची पाद्यपूजा, गुरुचरित्र सप्ताह पठण व दत्तनामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य होणार आहे.
दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण (देवेंद्र नाईक) यांचा ‘गौरीस्वयंवर‘, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता श्री महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी (भाई शिर्के) यांचा ‘कृष्ण परतोनि येई गोकुळी‘, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली (बाबा मेस्त्री) यांचा ‘दशरथ कौसल्या विवाह‘, ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ वालावल (नाथा नालंग) यांचा ‘कृष्मांडादेवी महिमा‘, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस (शरद मोचेमाडकर) यांचा ‘शिवमहाकाल‘, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आजगांवकर दशावतार नाट्य मंडळ, आजगांव (रमेश आजगांवकर) ‘वैकुंठपर्णिका‘, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (भाई कलिगण) यांचा ‘त्रिसंगम स्वरुपनी‘ आदी दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहेत.
वेंगुर्ले (वार्ताहर)-