केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती लाभणार
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आयोजित बूथ सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.भाजपच्या केंद्रीय समिती च्या मार्गदर्शन खाली सदर कार्यक्रम होणार आहे. या निमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रम होणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थिती राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. 21जून ते 31जुलै या कालावधीत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
आज मंगळवारी21 रोजी.पंचायत आणि पालिका क्षेत्रात विविध योगा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रम प्रमुख सिद्धी पोरोब, शिवनाथ परब, रामा नाईक.
गुरुवारी 23 रोजी. शामा प्रसाद मुखर्जी निमित्त बलिदान दिवस कार्यक्रम प्रमुख विठोबा घाडी, सुभाष फोडेकर,शांबा गावकर. शनिवार 25रोजी. आणि बाणी संबंधित निषेध नोंद कार्यक्रम, लघुपट दर्शन कार्यक्रम प्रमुख गणेश घाडी, राहुल पारोडकर, युवराज नाटेकर, संदेश कामत. बुधवार 6 जुलै रोजी.शामा प्रसाद मुखर्जी जयंती कार्यक्रम प्रमुख संतोष मळीक, रोहिदास कानसेकर, कृष्णा गावस
सदर कार्यक्रम निमित्त मतदारसंघात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.तसेच विविध रंगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सांखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या कार्यक्रमसाठी सांखळी मतदारसंघात गोपाळ सुर्लकर, संजय नाईक, संतोष मळीक,दिपराज प्रभू, दत्ताराम चिमूलकर, प्रवीण गावस, स्वाती
मायनिकर, नारायण गावस, शुभदा सावईकर,राजेन्द फाळकर,शशिकांत नार्वेकर, विनय पवार, साईराम गावस हे 23 जून ते 31 जुलै या कालावधीत होणाऱया विविध कार्यक्रम साठी निवडलेली वरील समिती च्या मार्गदर्शन खाली विविध कार्यक्रम होणार आहे.