Tarun Bharat

एक अनोखा कृतज्ञता सोहळा;अनाथ, वंचित मुले साधणार डॉ. सुनीलकुमार लवटेंशी संवाद

रविवारी एक अनोखा कृतज्ञता सोहळा ; वंचित स्नेहीजन सद्भाव समितीतर्फे आयोजन


प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : अनाथ वंचित मुलांसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा कृतज्ञता सोहळा येत्या रविवारी (दि. 6) आयोजित केला आहे. वंचित स्नेहीजन सद्भाव समितीच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला असून, जी अनाथ वंचित मुले आहेत ती एकत्र येऊन डॉ.लवटे यांचा यानिमित्ताने गौरव करणार आहेत. पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये दुपारी चार वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. ही माहिती आयोजक अध्यक्ष सुभाष नारे यांनी दिली.

डॉ. लवटे हे अनेक वंचित मुलांचे आधारस्तंभ बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुला-मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली.त्यांच्याबद्दल आजही शेकडो मुलांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे.हा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करावा यासाठी वंचित अनाथ असणारी मुले एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त जिल्हाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख असणार आहेत. यावेळी पुण्यातील कृषी परिषदेचे सहसंचालक अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, पंढरपूरचे उद्योजक अमीरभाई भयाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भुषण बापट यांनी केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन गुरुप्रसाद पाटील ,अर्चना बनगे-मिरजकर, सागर बगाडे, सचिन माने, सरस्वती चव्हाण, रूपाली नारे आणि अनाथ वंचित मुलांनी केले आहे.

Related Stories

बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींचीच बाजी; आपल्या जिल्ह्याचा निकाल पहा एका क्लिकवर

Archana Banage

माझ्याकडे ४० आमदार तीच खरी शिवसेना,एकनाथ शिंदे यांचा दावा, शिंदे आज राज्यपालांना भेटणार

Rahul Gadkar

समाजहितासाठी प्रथम शासनाचा आदेश पाळा; करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामीजींचे आवाहन

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात तिघांचा बळी, 150 पॉझिटिव्ह

Archana Banage

शिक्षक मतदारसंघात तांत्रिक दोषामुळे १० हजार पदवीधरांची नोंद

Archana Banage

सरसेनापती साखर कारखान्यात उत्पादित पहिल्या सात साखर पोत्यांचे पूजन

Archana Banage