Tarun Bharat

जगासमोर खाद्य संकटासह अन्य समस्या

डब्लूइइफची बैठक : मुख्य अर्थशास्त्रज्ञांकडून विविध विषयांचे अहवाल सादर 

वृत्तसंस्था/ दावोस

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूइएफ) च्या मंचावर सोमवारी मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी विविध टप्यावर जागतिक आर्थिकस्थितीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कोणता परिणाम होणार किंवा होणार नाही यासह अन्य घटकांची चर्चा घडवून आणली आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेसमोरील कर्ज संकट, खाद्य तसेच इंधन सुरक्षा याच दरम्यान अन्य समस्यांचीही चर्चा या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली. याचाच काहीसा आढावा याठिकाणी घेत आहोत.

दावोस येथील परिषेदेत मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या अहवालात सर्वाधिक महागाई ही अमेरिकेत होणार असल्याचे म्हटले आहे. त्यापाठोपाठ युरोप तसेच लॅटिन अमेरिका व अन्य देशांचाही यामध्ये समावेश होणार असल्याचे म्हटले आहे. यासह उच्च आणि निम्न उत्पन्न असणाऱया अर्थव्यवस्थेमध्ये मजुरी करणाऱयांची संख्या कमी होणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.

खाद्य संकटासोबत जगाचे दोन हात 

जगामध्ये खाद्य संकटाची स्थिती ही फारशी चांगली नाही. विशेष करुन पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका, तसेच दक्षिण आशियात हे वातावरण काहीसे काळजीचे आहे. इतिहासाचा मागोवा घेतल्यास ही स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक स्थितीनुसार पुरवठा साखळी सुस्थितीत करण्यावर भर देत आहेत. यामध्ये किमतीत तेजी येण्याची शंकाही मांडली जात आहे.

चालू वर्षात अनेक समस्या?

सदरच्या बैठकीमध्ये 2022 मध्ये आर्थिक वृद्धीचा वेगातील नरमाईचा कल, उच्चांकी पातळीवरील चलनवाढ, वास्तवातील मजुरांची घटती संख्या आणि जागतिक पातळीवरील खाद्य सुरक्षेची काळजी आदी प्रश्न समोर असल्याचे अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले.

जागतिक आर्थिक मंदीची शक्यता नाही ः आयएमएफ प्रमुख

जग आर्थिक मंदीच्या दिशेने जाण्याची शक्यता कमी असून आपण मंदीच्या खूप दूर आहोत.एकंदर पाहता आपण पूर्णपणे या मंदीच्या संकटाच्या परिघा बाहेर नसल्याचेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे महासंचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी दावोस येथील डब्लूइएफच्या परिषदेत स्पष्ट केले आहे.

Related Stories

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून संघाच्या भाजपला कानपिचक्या

Patil_p

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

मर्सिडीज बेंझची गुगलसोबत हातमिळवणी

Patil_p

बँक ऑफ महाराष्ट्र नफ्यात

Patil_p

‘गोएअर’चा आयपीओ लवकरच

Patil_p

बर्गर किंगच्या आयपीओला चांगला प्रतिसाद

Patil_p