Tarun Bharat

..अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात प्रवेश बंद

शिवसेनेचा इशारा; राजर्षी शाहू स्मृती स्मारक स्थळाच्या निधीवरुन शिवसैनिक आक्रमक; कोल्हापूर बंदचा दिला इशारा; महाद्वार रोडवर निधी संकलन मोहिमेतून सरकारचा निषेध

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती स्थळाचा निधी रोखून शिंदे सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा अपमान केला आहे. 15 ऑगस्टपुर्वी स्मारकाचा 10 कोटी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्या अन्यथा कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल. तसेच मुख्यमंत्र्यांनाही कोल्हापुरात प्रवेश बंद करण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी दिला.

नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती स्मारक स्थळाचा दूसऱया टप्प्यातील 10 कोटी 40 लाखा रुपयांचा निधी शिंदे सरकारने रोखल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. समाज कल्याण विभागाकडुन निधी मंजूर असूनही तो वर्ग न झाल्याने शिवसैनिकांनी शुक्रवारी जनतेसमोर झोळी पसरुन निधी संकलनाची मोहिम राबवत राज्य सरकारचा आगळय़ा-वेगळय़ा पद्धतीने निषेध केला.

बिनखांबी गणेश मंदीर येथून दुपारी 12 वाजता निधी संकलन मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी निधी रोखणाऱया शिंदे सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, माळकर तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर निधी संकलन मोहिमेची सांगता झाली. हा संकलित केलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिंदे सरकारने राजर्षी शाहू स्मृती स्मारक स्थळाचा निधी रोखून कोल्हापुरवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. सरकारकडे निधी नसेल तर कोल्हापुरची स्वाभिमानी जनता निधी संकलित करुन राज्य सरकारला देईल. 15 ऑगस्टपुर्वी सरकारने निधी वर्ग करावा, अन्यथा कोल्हापूर बंदसह मुख्यमंत्र्यांनाही कोल्हापुरात पाऊल टाकू न देण्याचा इशारा पवार यांनी दिला.

याप्रसंगी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे, उपशहर प्रमुख विशाल देवकुळे, सागर साळोखे, उपजिल्हाप्रमुख अवधुत साळोखे, युवासेना जिल्हाध्यक्ष मंजित माने, स्मिता सावंत, धनाजी यादव, रणजीत कोंडेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : उद्योगांना लॉकडाऊन काळातील किमान वीज आकार रद्द करा

Abhijeet Shinde

कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बनला सुकर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मृत वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांवर डल्ला

Abhijeet Shinde

रस्त्याअभावी मातेसह नवजात बालकाला मृत्यूने गाटले

Abhijeet Shinde

जीव धोक्यात घालून वाघापूरच्या ४ युवकांनी पाणीपुरवठा केला सुरळीत

Abhijeet Shinde

‘त्या’ बैठकीतील पोलीस अधिकाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!