Tarun Bharat

आपले पूर्वज माकडे नाहीत तर मासे

Advertisements

सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असणारे बुद्धिवान माणसाची उत्क्रांती कशी झाली? आणि त्याचे मूळचे पूर्वज कोण आहेत हा गेल्या दीडशे वर्षापासूनचा औत्सुक्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. जगभरात असंख्य मानव वंशशास्त्रज्ञ यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लाऊन प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंतचा समज असा आहे की, माकडांची उत्क्रांती होत होत त्यांच्यापासून आधुनिक बुद्धिमान मानव (होमो सेपियन) निर्माण झाला. तथापि ही समजूत इतिहासजमा होणे शक्य आहे.

नव्या संशोधनात असे स्पष्टपणे आढळले आहे की, मानवाचा मूळ पूर्वज माकड नसून मासा हा आहे. अलीकडच्या काळात माश्यांच्या पाच प्रजातींचे अश्मीभूत अवशेष (फॉसिल्स) मिळाले आहेत. त्यांच्या अभ्यासावरून मानवाचा पूर्वज मासा असावा या अनुमानाला मोठीच बळकटी मिळत आहे. जलचर असणाऱया माश्यांच्या काही प्रजाती उत्क्रांतीच्या ओघात समुद्रातून भूमीवर आल्या आणि भूमीवरच स्थायिक झाल्या. त्यांच्यापैकी एका प्रजातीची उत्क्रांती होत होत आजचा मानव निर्माण झाला. आजच्या मानवाचा जबडा, माकडहाड, मणका इत्यादी महत्त्वाचे अवयव माश्यांच्या याच प्रजातींची देणगी आहे, असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात या विषयावर निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता असून येत्या चार-पाच वर्षात संशोधनाला निश्चित दिशा मिळण्याची शक्यता आहे. जलचर मासे भूमीवर साधारणतः 41 ते 42 कोटी वर्षापूर्वी आले असावेत. तेव्हापासून त्यातील एका प्रजातीत सातत्याने उत्क्रांती होत 50 लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राणी निर्माण झाला असावा आणि त्यापासून नंतर आजच्या मानवाची निर्मिती झाली असावी असा कालक्रम आता सांगण्यात येत आहे. या संशोधनामुळे मानव वंशशास्त्राला नवे वळण मिळाले आहे.

Related Stories

पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांवर

datta jadhav

सिंगापूरने दिली फायझरच्या पॅक्सलोविड गोळीला मंजुरी

Patil_p

अमेरिकेत जुलैपर्यंत सर्वांना मिळणार कोरोना लस

Omkar B

पाकिस्तानला नोव्हेंबरमध्ये मिळणार नवा सैन्यप्रमुख

Patil_p

दक्षिण कोरिया अन् ऑस्ट्रेलियात संरक्षण सहकार्य

Patil_p

आण्विक गळतीनंतर वरिष्ठ वैज्ञानिकाचा गूढ मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!