प्रतिनिधी / बेळगाव
शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ करणाऱ्या बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी आज पुन्हा विकास मोहीम सुरू ठेवली.
शहरातील कोनवाळ गल्लीत आज 36 लाख रुपये खर्चून पेव्हर्स व गटारची कामे हाती घेण्यात आली आहेत. रेडिओ कॉम्प्लेक्सजवळील गटाराच्या कामांसाठी २१ लाख रुपये, रामलिंगखिंड गल्ली येथील रस्त्याच्या कामासाठी ३१ लाख रुपये, अनसुरकर गल्ली येथील रस्ते व गटार कामांसाठी १६ लाख रुपये, केळकर बाग येथील रस्त्याच्या कामांसाठी ५६ लाख रुपये एकूण रु. 3.90 कोटी खर्चाच्या कामांचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले, आमच्या मतदारसंघात आज आम्ही रस्ता, गटार, पेव्हरचे काम सुरू केले असून, एकूण 3.90 कोटी रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात झाली आहे. काम पाहण्यासाठी लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कामे दर्जेदार होतील. आगामी काळातही आमचा विकास सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर, जयतीर्थ कट्टी, अभिजीत सुनगार, बाळू मासनकर, रामा शिंदोळकर यांच्यासह इतर उपस्थित होते.