पाच वर्षांची मुदत संपली : मीटर जळाल्यास 6 हजार 700 रुपयांचा भरावा लागतोय दंड
प्रतिनिधी /बेळगाव
घर अथवा अपार्टमेंटच्या बांधकामासाठी हेस्कॉमकडून देण्यात येणाऱया टेम्पररी प्रि-पेड मीटरची वैधता (वॉरंटी) संपूनही ते मीटर ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. यामुळे एखाद्यावेळी जर मीटर जळाले तर त्या बदल्यात 6 हजार 700 रुपयांचा दंड ग्राहकांना भरावा लागत आहे. त्यामुळे वैधता संपली तरी प्रि-पेड मीटरची सक्ती हेस्कॉमकडून का करण्यात येत आहे? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
हैदराबाद येथील सेक्मयुअर या कंपनीला 2017 मध्ये हेस्कॉमने प्रि-पेड मीटर पुरवठा करण्याचे कंत्राट दिले होते. ते पाच वर्षांसाठीचे होते. कंपनीकडून हेस्कॉमला लागणारे टेम्पररी मीटर पुरवठा केले जात होते. परंतु, जून 2022 मध्ये या कंपनीचे कंत्राट संपले असून मीटरची वैधताही संपली आहे. ग्राहकाला टेम्पररी वीज कनेक्शन देताना 6 हजार 570 रुपये अनामत रक्कम भरून घेतली जाते. परंतु, एखाद्या वेळेस मीटर जळाल्यास पुन्हा ग्राहकांकडून त्या मीटरची किंमत 6 हजार 700 रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल केली जात आहे. ही एक प्रकारची ग्राहकांची लूटच आहे. हेस्कॉमच्या या अनागोंदी कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
प्री-पेड मीटरची सक्ती का?
हेस्कॉमच्या बेळगाव शहरअंतर्गत तीन उपविभाग येतात. यापैकी उपविभाग-1 व 2 या दोन कार्यालयांमध्येच प्रि-पेड मीटरची सक्ती केली जाते. मात्र, शहर उपविभाग-3 मध्ये प्रि-पेड मीटरची सक्ती नसून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना सामान्य मीटरही दिले जातात. त्यामुळे हेस्कॉमच्या दोन विभागांमध्ये दोन वेगवेगळे नियम कसे काय लागू केले जातात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात मीटरची वैधता संपली असतानाही टेम्पररी मीटरसाठी प्री-पेड मीटर देणेच चुकीचे आहे.
घर अथवा अपार्टमेंटच्या बांधकामावेळी एकाचवेळी सेंट्रिंग, फरशी फिटिंग व इतर कामे सुरू असतात. त्यामुळे चुकून एकाचवेळी दोन ते तीन कटर मशीन सुरू केल्यास विद्युतभार पडून मीटर जळण्याची शक्मयता असते. असे झाल्यास हेस्कॉमकडून त्या मीटरचे पैसे ग्राहकाकडून वसूल केले जातात. सेक्मयुअर कंपनीकडून देण्यात आलेले बरेच मीटर आता खराब होत आले असून त्यांची वॉरंटीही संपलेली आहे. एखाद्यावेळी ग्राहकाकडून ते जळाल्यास त्याचा नाहक भुर्दंड ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. हे प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे आहे.
पोस्टपेड मीटरची गरज
2017 पूर्वी टेम्पररी कनेक्शनसाठी पोस्टपेड मीटर वापरले जात होते. त्यावेळी ग्राहकांच्या तक्रारीही कमी होत्या. परंतु, प्रि-पेड मीटरमुळे तक्रारी तर वाढल्याच आहेत, शिवाय हेस्कॉमचा सावळा गोंधळही पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात टेम्पररी कनेक्शनचे बिल चिठ्ठीवर लिहून दिले जात होते. तसेच मीटरमध्ये बिघाड झाल्यास त्याचा खर्च ग्राहकांच्याच खिशातून जात होता. त्यामुळे प्रि-पेड मीटरपेक्षा पोस्टपेड मीटर परवडते, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे यापुढील काळात हेस्कॉमने टेम्पररी कनेक्नशसाठीही पोस्टपेड मीटरचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात वरिष्ट अधिकाऱयांना माहिती देणार…
टेम्पररी कनेक्शनसाठी दिल्या जाणाऱया प्रि-पेड मीटरची गुणवत्ता तपासली जाणार असून यासंदर्भात वरिष्ट अधिकाऱयांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
एम. टी. अप्पण्णावर, (कार्यकारी अभियंते हेस्कॉम)