वाखरी परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरचे टायर फोडले : 50 ट्रक्टरची अडवणूक : ऊसतोडी बंद
पंढरपूर/प्रतिनिधी
उसाला पहिली उचल 2500 व अंतिम दर 3100 देण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा ऊसदर संघर्ष समितीचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र, बुधवारी रात्री वाखरी परिसरात ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टर व ट्रॉलीचे टायर अज्ञात व्यक्तींकडून फोडण्यात आले. तर सोनके परिसरात ऊस वाहतूक करणारे 50 ट्रक्टर अडविण्यात आल्याने पंढरपुरात ऊसदर आंदोलनाचा भडका उडालेला आहे.
सोलापूर जिह्यामध्ये साखर कारखान्याची संख्या 36 आहे. उजनी धरण, भीमा नदी व भाटघर प्रकल्पामधून येणाऱया पाण्यामुळे सोलापूर जिह्यामध्ये उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जात आहे. साखर कारखान्यांकडून होणारी रिकव्हरी चोरी, ऊस वजनात काटामारी यामुळे शेतकऱयांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी संघटनांच्या लढय़ामुळे सोलापूर जिह्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांना चांगल्या प्रकारचा दर गेल्या काही वर्षात मिळू लागला आहे.
कोरोना कालावधीत काही कारखान्यांचे ऊस गाळप बंद होते तर ऊस लागवड घटली होती. यंदाच्या गळीत हंगामात मोठय़ा प्रमाणात ऊस उपलब्ध होणार असल्याने साखरेचे उत्पादनसुद्धा भरपूर होणार आहे. खताचे वाढलेले दर, मजुरीचे वाढलेले दर व इतर खर्चांमुळे ऊस शेती तोटय़ाची बनत चालल्याने उसाला एकरकमी उचल 2500 तर अंतिम दर तीन हजार शंभर रुपये देण्याची मागणी सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आलेली आहे. सुरुवातीला ऊस वाहतूक करणाऱया चालक व मालकांना विनंती करून ऊस वाहतूक करू नये यासाठी विनवणी केली जात होती तर उसाच्या फडात जाऊन ऊसतोड मजुरांना देखील विनवणी केली होती. तालुक्मयामध्ये ऊस उत्पादक शेतकऱयांच्या बैठका घेऊन उसाला अंतिम दर तीन हजार 100 रुपये कसा मिळू शकतो याबाबत चर्चा देखील करण्यात आलेली होती. तर काही ठिकाणी ऊसतोडी देखील बंद करण्यात आलेल्या होत्या.
सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांना क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टरवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई देखील सुरू केलेली आहे. पानीव (ता. माळशिरस), खुडूस (ता. माळशिरस), विझोरी (ता. माळशिरस), चिकमहूद (ता. सांगोला), गादेगाव (ता. पंढरपूर) व आदी ग्रामपंचायतींनी ठराव करून ऊस दर आंदोलनास पाठिंबा दर्शविलेला आहे.
सोमवारी सोलापुरात बैठक
सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समिती यांनी 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांना ऊसदराबाबत तोडगा काढण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालक साखर, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समिती व सोलापूर जिह्यातील सहकारी व खासगी साखर कारखानदारांची 31 ऑक्टोबर रोजी नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर येथे ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो यानुसारच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.