Tarun Bharat

भगवा झेंडा हाच आपला उमेदवार; उद्धव ठाकरेंचा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जोमानं कामाला लागलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे Eknath Shinde) गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) शिवसेनेला दिली आहे. मैदानावर मेळाव्याची परवानगी नाकारण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळं एक नेता, एक मैदान ही शिवसेनेची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. न्यायालयाच्या सुनावणीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद साधला.

मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याला परवानगी दिली. त्यानंतर दादरच्या शिवसेनाभवनासह राज्यभरात जल्लोष सादरा करण्यात आला. मात्र, जेव्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती, त्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना “आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा : ठाकरेंचीच शिवसेना जिंकली, दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाची परवनगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर गर्दी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधत “महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयरीला लागा”, असे म्हटले.

Related Stories

अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रिया दोन दिवसात सुरु होणार ; लष्कर प्रमुखांची घोषणा

Abhijeet Shinde

शाळांच्या ऑफलाईन वर्गांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही: शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde

पालिकेच्या वसुंधरा अभियानाचा फियास्को

Patil_p

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

datta jadhav

भाजपच्या ‘या’ नेत्याने हसन मुश्रीफांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं दुःख नाही- राजू शेट्टी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!