Tarun Bharat

KOLHAPUR;अति उत्साहीपणा भोवला, राऊतवाडी धबधब्यावर तरूणांना राधानगरी पोलिसांकडून चोप


राधानगरी (कोल्हापूर)

तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे वर्षापर्यटनासाठी आलेल्या तरुणांनी दाखवलेला अति उत्साहीपणा त्यांना भोवला आहे. तरुणांना राधानगरी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. धबधब्याच्या कडेवर चढणाऱ्या तरुणांना खाली बोलवत त्यांना पोलिसांनी चोपदिला आहे. रविवार असल्याने काल राऊतवाडी धबधब्यावर गर्दी होती.

राधानगरी तालुका वर्षा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत असतात,राधानगरी शहरापासून ७ की मी अंतरावर असलेल्या राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी व पावसाळी पर्यटनासाठी युवकवर्गाची गर्दी दररोज वाढत आहे, विशेषतः शनिवारी , रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर युवकवर्ग, आबालवृद्धसह अनेक कुटूंबे हा धबधबा व पावसाळी पर्यटनासाठी येत असतात, मात्र अति उत्साही तरुणांनामुळे इतर पर्यटकांना नाहक त्रास सोसावा लागतो, याची प्रचिती रविवारी दुपारी चारच्या दरम्यान राऊतवाडी धबधब्यावर आली, पर्यायाने अश्या पर्यटकांना राधानगरी पोलिसांकडून चोप देण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधामुळे पर्यटन स्थळे बंद होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा पर्यटन स्थळे गजबजून गेली,पावसाळ्याच्या सुरवातीस यावर्षी राऊतवाडी धबधबाने उचांक गाठला असून काही अति उत्साही तरुण हिडीस नृत्य करणे, मद्य प्राशन करून रस्त्यावर मद्याच्या बाटल्या फोडणे, वेगाने मोटारसायकल चालवणे, कड्यावरून डोकावणे, पाण्यात उडी मारणे यामुळे धबधब्यावर किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे,वारंवार होणारी वाहतूक कोंडी एकतरर्फी केलेले वाहनाचे पार्किंग यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्रास सोसावा लागतो, याची जाणीव ठेवून पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटावा, स्थानिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे

Related Stories

संयोगिताराजेंनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

Abhijeet Khandekar

Kolhapur : अधिकाऱ्यांना अरेरावी करत असाल तर ते बांधकाम पाडणारच!

Abhijeet Khandekar

‘शिरोली आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामात हलगर्जीपणा’

Archana Banage

पटट्य़ाच्या बाहेरील साहित्य जप्त

Archana Banage

जयसिंगपुरात यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांत राडा, कार्यालयावर दगडफेक

Abhijeet Khandekar

इचलकरंजी नगरपालिकेत युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Archana Banage