क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा इनडोअर स्टेडियम येथे ए.झेड.मार्शल आर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे 212 कराटेपटू सहभागी झाले होते. त्यांनी कटाज व कुमिटे स्पर्धेत 92 सुवर्ण, 98 रौप्य आणि 119 कांस्य अशी एकूण 309 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांमधून 1650 खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे संयोजक डॉ. ए. झेड मुहीब आणि कर्नाटक कराटे असोसिएशनचे सचिव कोशी एम.अल्ताफ पाशा यांच्या हस्ते इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांना चषक व कोरियन समुराय देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्या कराटेपटूंना कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर, हेमलता काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा, विजय सुतार, हरीष सोनार, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर आणि परशुराम नेकनार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.