आर एस मुनीर, शशिकला नाडगौडा यांना वैयक्तिक विजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक क्रीडा स्पर्धेत सीआरडीआर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर आर. एस.मुनीर व शशिकला नाडगौडा यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले.
जिल्हा पोलीस परेड मैदानावर आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये तग ऑफ फोर (रसिखेच) स्पर्धेत डीआरसीआर संघाने विजेतेपद तर मार्केट संघाने उपविजेतेपद
पटकावले.
व्हॉलीबॉल स्पर्धेतमध्ये सीआरडीआरने विजेतेपद तर मार्केट संघाने उपविजेतेपद. कबड्डी स्पर्धेत सीआरडीआर संघाने विजेतेपद तर अथणी-चिकोडी डिव्हिजनने उपविजेतेपद पटकाविले. क्रिकेट स्पर्धेत एसपी इलेव्हन संघाने विजेतेपद तर पत्रकार संघाने उपविजेतेपद पटकाविले.
या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एमएलआयआरसीचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगया, उपआयुक्त पी. व्ही. स्नेहा, डीसीपी रवींद्र गडद, महानंद नंदगावा, डीआरएसपी एस. वाय. पाटील, डीसीपीसी वाय काशण्णावर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सर्व संघानी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. पाहुण्यांचे स्वागत जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना चषक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पॅरा ऑलंम्पिक जलतरण स्पर्धेत यश संपादन केलेल्या पृथ्वी नारळेकर व प्रज्वल नारळेकर, राष्ट्रपती पदक विजेते धर्मेंद्र शिंदे यांचा खास गौरव करण्यात आला.
यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरबी शेख यांनी केले. तर आयुक्त बोरलिंग या यांनी आभार मानले.