म्हैसाळ/प्रतिनिधी
येथील कृष्णा नदीवर असलेला कोल्हापूर पध्दतीचा म्हैसाळ बंधारा ऐन उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहत आहे. वरून कृष्णानदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीला भरपूर पाणी आले आहे. बंधाऱ्याची काही दरवाजे बंद असल्यामुळे बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. ऐन उन्हाळ्यात म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालू असून पाणी कमी पडू नये तसेच शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पाटबंधारे विभागाने दक्षता घेतली आहे.
पाण्याची पातळी वाढल्याने कृष्णा नदी तुडुंब भरून वाहत आहे. शिवाय पलिकडे कर्नाटक भागातही पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते आहे. एकंदर पाटबंधारे विभागाने उन्हाळ्यात पाणी साठा कमी पडू नये म्हणून पाण्याचे नियोजन चांगले केले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.