Tarun Bharat

वेंगुर्ला मार्गावर कोसळलेल्या झाडांकडे दुर्लक्ष

Advertisements

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील वाहतुकीला अडथळा : झाडे हटविण्यासाठी दिरंगाई, रात्री अपघाताची शक्यता

प्रतिनिधी /बेळगाव

अतिपावसामुळे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलिटरी फार्मनजीक कोसळलेली झाडे आणि फांद्यांकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रात्रीच्या अंधारात अपघात घडण्याची शक्मयता आहे. कोसळलेली झाडे आणि फांद्या तातडीने हटवाव्यात, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

मागील चार दिवसांत झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी पडलेली झाडे तातडीने हटविण्यात आली. मात्र अद्याप काही ठिकाणची पडलेली झाडे तशीच आहेत, त्यामुळे वाहतुकीस अडसर निर्माण होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर युनियन जिमखाना ते महात्मा गांधी पुतळय़ापर्यंत दोन ठिकाणी झाडे आणि फांद्या पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय अपघाताची शक्मयता वर्तविली जात आहे. या मार्गावर सातत्याने  झाडे कोसळत असल्याने हा मार्ग धोकादायक बनत आहे. त्यामुळे येथील झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणीदेखील होत आहे.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलावापर्यंत दुतर्फा असलेली झाडे धोकादायक ठरू लागली आहेत. पाऊस वाऱयामुळे सातत्याने या ठिकाणी झाडांची पडझड सुरू आहे. झाडे उन्मळून पडत असल्याने वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. अद्यापही या मार्गावर धोकादायक झाडे आहेत. त्यामुळे वाहनधारकांना भीतीच्या छायेखाली ये-जा करावी लागत आहे. या ठिकाणी पाऊस-वादळाने कोसळलेली झाडे आणि फांद्या हटविण्यास दिरंगाई झाल्याने वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. विशेषतः बेळगुंदी, नावगे, राकसकोपसह इतर ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

दोन दिवसात तीन झाडे कोसळली…

जोरदार पावसामुळे घरांची आणि झाडांची पडझड सुरूच आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर दोन दिवसांत तीन झाडे कोसळली आहेत. गुरुवारी एक झाड व फांदी तर त्यापाठोपाठ शुक्रवारी पुन्हा एक झाड या मार्गावर कोसळले आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. या मार्गावर सातत्याने झाडे कोसळत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. झाडे उन्मळून पडत असल्याने ये-जा करणे धोक्मयाचे बनले आहे. धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

तलाठय़ाला पाठीशी घालणाऱया तहसीलदारांना न्यायालयाचा दणका

Amit Kulkarni

आरपीडी क्रॉस येथे बेशुद्धावस्थेत आढळला अज्ञात व्यक्ती

Rohan_P

साईराज वॉरियर्स- विश्रृत स्ट्रायकर्स यांच्यात आज अंतिम लढत

Patil_p

बळ्ळारी नाल्यापर्यंतच्या ‘त्या’ कालव्याचे काम मजुरांकडूनच

Amit Kulkarni

शंकराचार्य जयंती प्रशासनातर्फे साजरी

Amit Kulkarni

कोरोना काळातील आशा कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद

Patil_p
error: Content is protected !!