ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddhin Owesi) यांनी रविवारी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly elections) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीत तीन नावे जाहीर केली असून आपला पक्ष कर्नाटक विधानसभेसाठी जोरदार तयारीने उतरत याची प्रचिती दिली आहे.
लतीफ खान पठाण हे बेळगाव– उत्तर 11 मतदारसंघातून, दुर्गाप्पा बिजावाड हे हुबळी धारवाड पूर्व 72 मधून निवडणूक लढवणार आहेत. अल्लाबक्ष विजापूर हे बसवना भागेवाडी 28 मतदारसंघातून एआयएमआयएम कडून रिणांगणात उतरतील.