Tarun Bharat

पाडलोस ग्रामस्थांनी लावला फेरीवाल्यांसाठी बंदीचा फलक

Advertisements

Padalos villagers put up a ban board for hawkers

मडुरा पंचक्रोशीत फिरणारे अनोळखी व्यक्ती किंवा फेरीवाल्यांकडून अनेकदा चोरीचे प्रकार घडले. तसेच सद्यस्थितीत मुले पळविणारी टोळी सावंतवाडी तालुक्यात फिरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाडलोस माडाचेगावळ येथील ग्रामस्थांनी वाडीतील रस्त्यावर अनोळखी व्यक्ती अथवा फेरीवाल्यांना सक्त मनाई केली आहे तसेच कुणीही संशयास्पद फिरताना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलकच लावल्याने ग्रामस्थ सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.


पाडलोस गावात फेरीवाल्यांकडून तांब्याची भांडी स्वच्छ करण्याच्या बहाण्याने अनेकदा चोरीचा प्रयत्न झालेत. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार घडला नाही. बांदा पोलिस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर काही काळाने पुन्हा एकदा अनोळखी व्यक्ती व फेरीवाले ग्रामपंचायत किंवा पोलिसांची परवानगी न घेता गावात बिनधडक घुसतात. सद्यस्थितीत लहान मुलांना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसविण्याचे प्रकार बांदा परिसर घडले आहेत. त्यामुळे पाडलोस गावातील प्रशासन व ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन फलक लावणारे ग्रामस्थ अमेय गावडे यांनी केले आहे. तसेच दिवसातून एकदा पोलिस गस्त असल्यास असे फेरीवाले परवानगीशिवाय गावात फिरू शकणार नाही असेही ते म्हणाले.

बांदा / प्रतिनिधी

Related Stories

……… नितेश राणे जनतेची जाण काय ठेवणार ?

NIKHIL_N

वार्षिक आराखडय़ाला 80 कोटीची कात्री

NIKHIL_N

जर एसटी कर्मचाऱयांच्या आडवे आले तर त्यांचा बंदोबस्त करणार

Patil_p

दापोलीत अद्याप 44 शाळा बंद

Archana Banage

एसटी कर्मचाऱयांचे विभागाकडून मानसिक खच्चीकरण

Patil_p

आशा वर्कर्सचा 8 रोजी मोर्चा

NIKHIL_N
error: Content is protected !!