बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. शहर प्रमुख अनंत चौगुले व वडगाव व अनगोळ विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तसेच भगवा ध्वज चढवून पदयात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धर्मवीर संभाजी महाराज चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी किरण गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. शंभूतीर्थ येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते भगवा ध्वज उतरविण्यात आला. याप्रसंगी विभागप्रमुख चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाण्णाचे, शिवाजी मंडोळकर, अमोल केसरकर यासह धारकरी उपस्थित होते.
Previous Articleजिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.