Tarun Bharat

वनडे मानांकनात पाकने भारताला टाकले मागे

Advertisements

वृत्तसंस्था / दुबई

आयसीसी पुरूषांच्या वनडे सांघिक मानांकनात पाकने भारताला मागे टाकले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजचा एकतर्फी 3-0 असा व्हाईटवॉश केला. या कामगिरीमुळे पाक संघाने आयसीसीच्या वनडे सांघिक ताज्या मानांकनात चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकन यादीत भारत पाचव्या स्थानावर घसरला आहे.

विंडीजविरूद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी पाकचा संघ या मानांकनात 102 मानांकन गुणांसह पाचव्या स्थानावर होता. पाकने विंडीजचा एकतर्फी पराभव केल्यानंतर त्यांनी 106 मानांकन गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पाक संघाची वनडे क्रिकेटमधील कामगिरी समाधानकारक झाली आहे. पाकने अलिकडेच झिंबाब्वेचा तसेच त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेत पराभव केला. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा 2-1 असे पराभूत केले होते. 1998 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल झाला होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाने क्रिकेटच्या विविध प्रकारात आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. पाकचा संघ आता पुढील वनडे मालिका ऑगस्टमध्ये खेळणार आहे.

Related Stories

हरियाणा स्टीलर्सवर पाटणा पायरेटस्ची मात

Patil_p

द. आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा मालिकाविजय

Patil_p

जितके जवळ होतो, तितकेच दूर राहिलो!

Patil_p

अमेरिकेच्या मॅक्लॉलिनचा नवा विश्वविक्रम

Patil_p

पंजाबकडून हॉकीपटूंसाठी बक्षिसांची घोषणा

Patil_p

जेम्स नीशम वेलिंग्टन फायरबर्ड्समधून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!