वृत्तसंस्था/ कराची
पहिल्यांदाच होणाऱया आगामी दक्षिण आफ्रिका टी-20 लीग स्पर्धेमध्ये पाकच्या अनेक अव्वल क्रिकेटपटूंनी खेळण्याचा निर्णय घेतला असून पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्यांना अधिकृत परवानगी दिली आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱया बऱयाच संघांचे फ्रँचाईजी भारतीय आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया या पहिल्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱया पाकच्या अनेक खेळाडूंची पीसीबीकडून कोणतीही अडवणूक केली जाणार नाही, असे सांगण्यात आले. पाक आणि विंडीज यांच्यात होणारी आगामी टी-20 मालिका लांबणीवर टाकण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. ही मालिका सुरुवातीला जानेवारी-2023 मध्ये निश्चित केली होती. पण आता सदर मालिका 2024 च्या प्रारंभापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पीसीबीशी मध्यवर्ती करार केलेले तसेच करार न केलेले क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिका टी-20 लीग स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने आपल्या देशातील क्रिकेटपटूंना दक्षिण आफ्रिका लीग टी-20 स्पर्धेत तसेच अमिरातमध्ये होणाऱया स्पर्धेसाठी परवानगी दिली नाही.