Tarun Bharat

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान (Pakistan Former PM Imran Khan) यांच्यावर रॅलीत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या गोळीबारात एकाच मृत्यू झाला आहे. तर गोळीबारानंतर एका हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे. वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ हा गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या रॅलीत गोळीबार करण्यात आला असून ते यात जखमी झाले आहेत. ही घटना जफर अली खान चौकात घडली. या गोळीबारात इमरान खान यांच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय आणखी चौघेजण या गोळीबारात जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

गुजराँवाला येथील रॅलीत इम्रान खान सहभागी झाले होते. रॅलीत अचानक हल्लेखोर घुसला आणि त्याने जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले. यामुळे पाचजण जखमी झाले आहेत. तर, इम्रान खान यांच्या पायालाही गोळी लागली आहे. पायाला गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related Stories

INDvsENG अंतिम सामन्यासह भारताचा 3-2 ने मालिका विजय

Archana Banage

जागतिक शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव

Amit Kulkarni

पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारविरोधात भाजपचा ‘टाहो’

Abhijeet Khandekar

सांगली जिल्हय़ात विक्रमी 106 रूग्ण वाढले

Archana Banage

पंतप्रधान हिटलरच्या मार्गाने गेल्य़ास…कॉंग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

Abhijeet Khandekar

साताऱ्यात आज ४३ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू

Archana Banage