Tarun Bharat

पाकिस्तानला दूर लोटले, भारताला घातली साद

अफगाणिस्तानच्या शहरी विकासात गुंतवणुकीचे आवाहन

वृत्तसंस्था/ काबूल

सुमारे 16 महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केलेल्या तालिबान राजवटीला जगाने अद्याप मान्यता दिलेली नाही. यामुळे तालिबान राजवटीची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तालिबानला आता भारताची मदत हवी आहे. याचमुळे तालिबान राजवटीने भारताला गुंतवणुकीचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानातील रस्त्यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी अशी विनंती तालिबानने भारताला केली आहे.

भारतीय तंत्रज्ञान मिशनच्या प्रमुखासोबतच्या बैठकीत तालिबानने हे आवाहन केले आहे. भारतीय उद्योजक शहरी आणि विशेषकरून न्यू काबूल सिटी प्रकल्पात भागीदारी करावी असे तालिबान राजवटीने बैठकीत म्हटले आहे. तर दुसरीकडे तालिबान राजवटीवरील पाकिस्तानचा प्रभाव ओसरत चालला आहे. तालिबान राजवटीत अफगाणिस्तानवर नियंत्रण राखता येईल अशी अपेक्षा पाकिस्तानला होती, परंतु आता स्थिती बदलल्याने पाकिस्तानचा भ्रमनिरास होत आहे.

भारताचे 20 प्रकल्प

अफगाणिस्तानात भारताचे स्थगित झालेले 20 प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. संबंध सुधारण्यात आणि अफगाणिस्तानातील भारतीय प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास भारताने स्वारस्य दाखविले आहे. तालिबानचे शहरविकास आणि गृहनिर्माणमंत्री हमदुल्ला नोमानी यांच्यासोबतच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधी भारत कुमार यांनी भूमिका मांडली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान राजवट सत्तेवर आल्यावर भारताला स्वतःचे सर्व प्रकल्प बंद करावे लागले होते. तालिबानची राजवट येण्यापूर्वी भारताने दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानात सुमारे 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याच्या अंतर्गत 400 हून अधिक प्रकल्प अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांमध्ये सुरू करण्यात आले होते.

पाकिस्तानशी वैर

अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात तणाव अन् गोळीबाराची स्थिती आहे. तालिबानने डय़ुरंड रेषा मानण्यास नकार दिला आहे. तसेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात हल्ले सुरू केले आहेत. काबूलमध्ये पाकिस्तानी राजदूतावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.

जपानची भारताशी सल्लामसलत

मागील काही काळात भारताने अत्यंत वेगाने तालिबान राजवटीत स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे. भारताने हिरवा कंदील दर्शविल्यानेच जपान देखील अफगाणिस्तानातील दूतावास पुन्हा सुरू करणार आहे. जपानने याकरता भारताशी सल्लामसलत केली होती.

Related Stories

सलग 107 दिवसांपासून मॅराथॉनमध्ये धावतेय महिला

Patil_p

फिंगरप्रिंट गायब करणारा आजार

Patil_p

अमेरिकेत कोरोनाचे मृत्यूतांडव

prashant_c

लॉकडाऊनचा फज्जा

Omkar B

पाकिस्तानात पोलीस आणि नौदल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

datta jadhav

पाकच्या मंत्र्यांचा पीर बाबा बनून महिलांना गंडा

datta jadhav