Tarun Bharat

टी-20 मालिकेत पाकची पुन्हा इंग्लंडवर आघाडी

Advertisements

वृत्तसंस्था /लाहोर

‘सामनावीर’ मोहम्मद रिझवानच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर येथे बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान पाकने इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करत सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 अशी पुन्हा आघाडी मिळविली.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकचा डाव 19 षटकात 145 धावात आटोपला. सलामीचा मोहम्मद रिझवान वगळता पाकचे इतर फलंदाज इंग्लंडच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर झटपट बाद झाले.

मोहम्मद रिझवानने संघाचा डाव सावरताना 46 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 63 धावा जमवित तो नवव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. कर्णधार बाबर आझमने 1 चौकारासह 9, इफ्तिकार अहमदने 1 चौकारासह 15, शान मसूदने 1 चौकारासह 7, शदाब खानने 1 षटकारासह 7 तर अमीर जमालने 1 चौकारासह 10 आणि हॅरिस रौफने 1 षटकारासह 8 धावा जमविल्या.

पाकच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांच्या डावात 5 षटकार  आणि 8 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे मार्क वूडने 3, विली आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 तसेच वोक्सने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार मोईन अलीने एकाकी लढत देत 37 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 51 धावा जमविल्या. पण मोईन अलीचे अर्धशतक वाया गेले. डेव्हिड मलानने 35 चेंडूत 6 चौकारांसह 36 तर डकेटने 2 चौकारांसह 10, सॅम करनने 1 चौकारासह 17 आणि वोक्सने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 139 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे हॅरिस रौफने 2 तर मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम, शदाब खान, इफ्तिकार अहमद आणि अमीर जमाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील आता उर्वरित दोन सामने शुक्रवारी आणि येत्या रविवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळविले जातील.

संक्षिप्त धावफलक

पाक 19 षटकात सर्वबाद 145 (मोहम्मद रिझवान 63, इफ्तिकार अहमद 15, अमीर जमाल 10, विली 2-23, मार्क वूड 3-20, सॅम करन 2-23, वोक्स 1-30), इंग्लंड 20 षटकात 7 बाद 139 (मोईन अली नाबाद 51, डेव्हिड मलान 36, डकेट 10, सॅम करन 17, वोक्स 10, रौफ 2-41, मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम, शदाब खान, इफ्तिकार अहमद, अमीर जमाल प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

प्रसिद्ध कृष्णा 23 मे रोजी मुंबईला रवाना

Patil_p

माद्रीद स्पर्धेतून स्वायटेकची माघार

Amit Kulkarni

चेन्नई सुपरकिंग्सचा 10 गडी राखून एकतर्फी विजय

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाड 28 जुलैपासून चेन्नईत

Patil_p

चेल्सी महिला संघ एफए फुटबॉल चषकाचा मानकरी

Patil_p

पंत-श्रेयस यांच्यात आजच्या सामन्यात चुरस

Patil_p
error: Content is protected !!