Tarun Bharat

पाकिस्तानी ड्रोनची पुन्हा घुसखोरी

तरनतारन येथील घटना ः भारतीय हद्दीत फेकले पाकीट ः 17 कोटींचे हेरॉइन जप्त

@ वृत्तसंसथा/ तरनतारन

पाकिस्तानातील तस्करांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेत ड्रोनची घुसखोरी घडवून आणली आहे. परंतु बीएसएफच्या सतर्क जवानांनी शोधमोहिमेदरम्यान ड्रोनकडून फेकण्यात आलेल्या हेरॉइनचे पाकीट जप्त केले आहे. या पाकिटात सुमारे 17 कोटी रुपयांचे हेरॉइन आढळून आले आहे.

हा ड्रोन तरनतारन जिल्हय़ातील कालिया या सीमावर्ती गावात दिसून आला होता. रात्रीच्यावेळी बीएसएफचे जवान सीमेवर गस्त घालत असताना त्यांना ड्रोनचा आवाज ऐकू आला. ड्रोनच्या आवाजाच्या दिशेने गोळीबार केल्यावर ड्रोन पाकिस्तानात परतला होता. बीएसएफच्या जवानांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांना दिली.

अंधार असूनही बीएसएफच्या अधिकाऱयांनी रात्रीच शोधमोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान कालिया गावातील शेतामध्ये एक पिवळय़ा रंगाचे पाकीट आढळून आले. पाकिट उघडण्यात आल्यावर त्यात 2.47 किलो हेरॉइन सापडले आहे.

मागील एक महिन्यात ड्रोनच्या कारवाया अधिक प्रमाणात दिसून आल्या आहेत. दर दुसऱया दिवशी पाकिस्तानमधून भारतीय सीमेत ड्रोन दाखल होत आहेत. एक महिन्यात सुमारे 8 ड्रोन बीएसएफने पाडविले आहेत. तरीही पाकिस्तानातील तस्कर सातत्याने अमली पदार्थ पाठविण्यासाठी ड्रोन्सचा वापर करत आहेत.

Related Stories

सियाचीनमध्ये 38 वर्षांनी मिळाले हुतात्म्याचे पार्थिव

Patil_p

देशात 30,548 नवे कोरोना रुग्ण, 435 मृत्यू

datta jadhav

मथुरा- वृंदावनमधील हॉटेलमध्ये चिनी नागरिकांना राहण्यास बंदी

Tousif Mujawar

ममता बॅनर्जी तिसऱयांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

Patil_p

रोजगार देण्याऱया शिक्षणावर भर

prashant_c

सिसोदियांची दिवसभर सीबीआयकडून चौकशी

Amit Kulkarni