अमृतसर / वृत्तसंस्था
पंजाब सीमेवर बीएसएफच्या जवानांना पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आणि दोन तस्करांना माघारी पाठवण्यात यश प्राप्त झाले आहे. अमृतसर सेक्टर अंतर्गत असलेल्या डाओके येथे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ड्रोनच्या हालचालीनंतर जवानांनी गोळीबार सुरू केला. गोळीबारात ड्रोन खाली कोसळले. बीएसएफ जवानांनी शोधमोहीम राबवत हे ड्रोन काही वेळातच हस्तगत केले. या ड्रोनसोबत असलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी केली जात आहे. एकीकडे ड्रोनच्या घिरटय़ा सुरू असतानाच दुसरीकडे पठाणकोट विभागातील फराईपूर चौकीत बीएसएफच्या जवानांनी दोन घुसखोरांना माघारी पाठवले. दक्षतेसाठी जवानांनी गोळीबार सुरू केल्यानंतर दोन्ही घुसखोर परतले.