Tarun Bharat

पाकिस्तानी ड्रोन पुन्हा भारतीय हद्दीत

Advertisements

बीएसएफ जवानांनी झाडल्या गोळय़ा ः अमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न असफल

श्रीगंगानगर / वृत्तसंस्था

भारत-पाकिस्तान सीमेवर अमली पदार्थांची तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा सीमेपलीकडून पाकिस्तानच्या ड्रोनने हेरॉईनची खेप भारतीय सीमेवर पोहोचवली आहे. मात्र यावेळी सीमेवर पाकिस्तानी ड्रोन पाहून बीएसएफच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार करून त्याला पळून जाण्यास भाग पाडले. या संपूर्ण कारवाईदरम्यान पाक तस्करांना अंमली पदार्थ भारतीय सीमेपर्यंत पोहोचवण्यात यश आले. पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिह्यातील अनुपगड येथील कैलास पोस्ट येथे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानी ड्रोनने भारतीय सीमेत घुसखोरी केली. पाकिस्तानी ड्रोन पाहून सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर ड्रोन गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शोधमोहीमेत बीएसएफच्या जवानांना एका पॅकेटमध्ये हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या या पॅकेटमध्ये सुमारे साडेतीन किलो हेरॉईन होते. भारतीय हद्दीत ड्रोन निदर्शनास आल्याने बीएसएफचे जवान अधिक अलर्ट मोडवर आले आहेत.

भारतीय हद्दीतील तस्करांचाही हात

भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी तस्कर दीर्घकाळापासून भारतात अमली पदार्थांची तस्करी करत आहेत. या कामात त्यांना सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या भारतीय ड्रग्ज तस्करांची मदत मिळते. स्थानिक तस्कर भारतीय हद्दीत फेकले जाणारे हेरॉईन अन्य ठिकाणी पोहोचवतात. त्या बदल्यात त्यांना भरघोस रक्कम दिली जाते. बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अशा तस्करांना पकडले आहे. मात्र तरीही सीमेपलीकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये 5.3 तीव्रतेचा भूकंप

Amit Kulkarni

लखनऊ : डिफेन्स एक्स्पोला आजपासून सुरूवात

prashant_c

85 वर्षीय इडली अम्मासाठी सरसावले महिंद्रा

Patil_p

पुदुचेरी : काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत नेत्यांमध्ये झटापट

datta jadhav

पंतप्रधान मोदींकडून अनेक शैक्षणिक योजना घोषित

Amit Kulkarni

भाजपच्या महापौरांना मोदींनी केले संबोधित

Patil_p
error: Content is protected !!