Tarun Bharat

बिहारच्या सीतामढीमध्ये पाकिस्तानी युवती ताब्यात

Advertisements

भारताच्या सीमेत घुसखोरी करताना कारवाई

वृत्तसंस्था/ सीतामढी

बिहारच्या सीतामढीमध्ये दोन महिन्यांपूर्वी चिनी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. आता एका पाकिस्तानी युवतीला भारतीय सीमेत घुसखोरी करताना अटक करण्यात आली आहे. या युवतीसोबत आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन जणांमध्ये एक नेपाळी नागरिक तर एक भारतीय नागरिक आहे. या सर्व आरोपींची एसएसबीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

भारत-नेपाळ सीमेवर सोमवारी रात्री नेपाळकडून तीन जण भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. संशयाच्या आधारावर एसएसबी चेकपोस्टनजीक गस्त घालणाऱया जवानांनी त्यांना रोखले होते. ताब्यात घेण्यात आलेली पाकिस्तानी युवती फैसलाबाद येथील रहिवासी असून तिचे नाव खदीजा नूर आहे. तिच्याकडून कॉलेजचे एक ओळखपत्र हस्तगत करण्यात आले आहे.

Related Stories

पुड्डुचेरी उपराज्यपालांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Patil_p

जंगलात होणारे रोडकिलिंग थांबवा

Patil_p

भारतनिर्मित ड्रोन्स करणार कृषी, आरोग्य सेवांना साहाय्य

Omkar B

13 रोजी ‘गति शक्ती’ मास्टरप्लॅन

Patil_p

सत्तासंघर्ष शिगेला, कायदेशीर लढा सुरू

Patil_p

तेदेपला पुन्हा रालोआत आणण्याचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!