श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील केरन सेक्टरमध्ये (जुमागुंड क्षेत्र) लष्कराने सोमवारी एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला. या कारवाईनंतर दिवसभर परिसरात शोधमोहीम सुरू होती. या भागात काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली होती. या इनपुटनंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. मोहिमेवेळी परिसराची नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमेला यश मिळाले असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.