Tarun Bharat

पाकिस्तानातील एकमेव ‘युनिकॉर्न’ दिवाळखोरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानातील एकमेव युनिकॉर्न कंपनी ही दिवाळखोरीच्या छायेत आहे. डोअरडॅश असे या कंपनीचे नाव असून ती घरोघरी खाद्यपदार्थ आणि जेवण पुरविण्याचा व्यवसाय करते. गेल्या दोन वर्षांत कोरोना उद्रेकामुळे या कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. या कंपनीचा प्रारंभ 2018 मध्ये करण्यात आला होता. उस्मान गुल यांनी अमेरिकेतून येऊन लाहोर येथे या कंपनीची स्थापना केली होती. त्यामुळे ती पाकिस्तानातील पहिलीच आणि एकमेव युनिकॉर्न कंपनी ठरली. तथापि कंपनीला त्यापुढे कोणतीही प्रगती करता आली नाही. पाकिस्तान सरकारकडून योग्यवेळी आर्थिक साहाय्यही मिळाले नाही. त्यामुळे अखेर तिला घरघर लागली आहे. पाकिस्तानात अद्यापही उद्योग व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण नाही हेच या उदाहरणावरुन दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.

या कंपनीपूर्वी पाकिस्तानमध्ये अशी सेवा पुरविण्याचे काम उबेर कंपनी करीत असे. अद्यापही उबेर सुरू आहे. मात्र उबेरच्या सेवा अतिशय महाग अशा होत्या. त्यामुळे उबेरची जागा घेण्यासाठी गुल यांनी ही कंपनी सुरू केली. तथापि पाकिस्तानात अद्यापही उद्योगधंद्यांपेक्षा आणि आर्थिक विचारांपेक्षा धार्मिक आणि कट्टरतावादी विचारसरणीला अधिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत उद्योगधंद्यांची निकोप वाढ होणे शक्य नसते. पाकिस्तानला उद्योग क्षेत्रांमध्ये पुढे यायचे असेल तर त्याने देशातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक तज्ञांनी या घटनेनंतर व्यक्त केले. यावरून पाकिस्तानने धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

Related Stories

आयव्हरी कोस्टच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

Patil_p

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले पूर्वनियोजित कटातूनच

Amit Kulkarni

अमेरिकेत 67 वर्षानंतर प्रथमच महिलेला मृत्यूदंड

datta jadhav

अध्यक्षपदासाठी दिलीप तिर्कीचा अर्ज दाखल

Patil_p

कोलकाता थंडरबोल्ट्स व्हॉलीबॉल लीग विजेता

Patil_p

प्रणॉय, समीर वर्मा पराभूत

Patil_p
error: Content is protected !!