लंडन
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपले बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी बुधवारी लंडनमध्ये पोहोचले. नवाज हे पाकिस्तान मुस्लीम लीग-एनचे सुप्रिमोही आहेत. शाहबाज यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांचे शिष्टमंडळही लंडनला आले आहे. काही मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन बैठक घेण्याऐवजी नवाज यांनी पक्षाच्या नेत्यांना लंडनला येण्यास सांगितले. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत पूर्णपणे गोपनीयता पाळण्यात आली आहे. मात्र, आता इम्रान खान सरकारच्या पाडावानंतर देशात सत्ता कशी टिकवून ठेवायची? यासंबंधी शरीफ बंधूंमध्ये चर्चा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.