सलमान खानच्या चित्रपटात शहनाज गिल
सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ मागील काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलकची एंट्री झाल्याचे समजते. पलकची निवड स्वतः सलमाननेच केली आहे. पलक आता शहनाज गिलसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाल्याचे समजते. या चित्रपटाचे नाव पुन्हा बदलण्याचा विचार सलमान करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी या चित्रपटाचे नाव ‘भाईजान’ असल्याचे बोलले जात होते. परंतु नंतर सलमानने ‘कभी ईद कभी दिवाली’ हेच नाव चित्रपटाला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. पलक तिवारीसाठी हा चित्रपट म्हणजे मोठी संधी ठरणार आहे. यापूर्वी पलकने अनेक म्युझिक व्हिडिओंद्वारे चाहत्यांना वेड लावले आहे. अशा स्थितीत तिला मोठय़ा पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी मोठी गिफ्टच ठरणार आहे.
यापूर्वी पलक एका चित्रपटातून झळकली होती. परंतु हा चित्रपट फारसा चालला नव्हता. पलक सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असून ती स्वतःची बोल्ड छायाचित्रे शेअर करत असते. सैफ अली खानच्या मुलाला ती डेट करत असल्याची चर्चा आहे.