म्हापसा /पणजी
वेर्ला काणका येथील श्री साईसेवा धाम विश्वस्त मंडळाच्या श्री साईंचा 36 वा पालखी उत्सव सोमवार दि. 2 व 3 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सोमवार दि. 2 रोजी सकाळी 9 वाजता आनंद कांदोळकर यांच्याहस्ते साईदया याग व इतर धार्मिक विधी होतील. सायंकाळी 7 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा रात्री 10 वाजता शेजारती होईल.
मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 10 वाजता ग्रहस्थापना, आरती तीर्थप्रसाद, महाप्रसाद होईल. सायंकाळी 4 वाजता मंदिरातून श्री साईबाबांच्या पादुका व उत्सवमूर्तीची पालखी ग्राम प्रदक्षिणेस निघेल. पहाटे 3 वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी साईकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नार्वेकर यांनी केले आहे.