दादा महाराज अष्टेकरांची परंपरा कायम जपणार
प्रतिनिधी / बेळगाव
वाडी रत्नागिरी येथील जोतिबाच्या डोंगरावर चैत्र यात्रोत्सव साजरा करून दादा महाराज अष्टेकर यांची भक्तमंडळी पायी बेळगावात दाखल झाली. पालखी बेळगावात दाखल झाल्यानंतर कोल्हापूर सर्कल येथे यात्रा पार पडली. आंबील, घुगऱया आणि पुरणपोळीचा नैवैध करून गुरुवारी पालखी मंदिरात आली.
दरवषी जोतिबा डोंगर येथील चैत्रोत्सवाला हे भक्त मोठय़ा संख्येने जात असतात. गेल्या 55 वर्षांची ही परंपरा आहे. चैत्रोत्सव यात्रा करून गुरुवारी पालखी नार्वेकर गल्ली येथील मंदिरामध्ये परतली आहे. उद्या सकाळी काळभैरवाची पूजा करून यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. जोतिबा डोंगराला 10 बैलगाडय़ा तसेच 250 भाविक पायी गेले होते. ही परंपरा कायम ठेवणार असल्याचे भाविकांनी यावेळी सांगितले.