भंडाऱयाची उधळण करत बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा जयघोष
वार्ताहर / कोगनोळी
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोगनोळी (ता. निपाणी) येथील बिरदेव यात्रेनिमित्त सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भंडाऱयाची उधळण करण्यात आली तसेच बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करण्यात आला.
यावेळी मंदिरामध्ये ढोलवादनाचा कार्यक्रम झाला. हे ढोलवादन भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. यात्रेच्या निमित्ताने मंदिराचे रंगकाम व सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, नारळ, साखर, कापूर, हॉटेल व खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोगनोळी पोलीस ठाण्याच्यावतीने साहाय्यक फौजदार एस. आय. कंबार, बीट हवालदार राजू गोरखन्नावर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला
आहे.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे पदाधिकारी, मानकरी, पुजारी व धनगर समाजबांधव परिश्रम घेत आहेत.